Thursday, March 24, 2011

तलावगावाशेजारचा तलाव म्हणजे
दहा मिनिटात गाठता येणारं सहलीचं ठिकाण.
संध्याकाळी दिवस मावळतीकडं झुकू लागला की
मन तलावाकडं ओढ घेऊ लागतं.
तलावाच्या तरंगांमध्ये मावळतीचे रंग बघणं
किंवा पश्चिमेकडं डोळं लावून बसलेले पक्षी न्‍याहाळणं
आणि गार झुळुकांना अंगावर घेत
झाडांचे बदलते रंग डोळ्‍यात साठवणं
यापेक्षा आणखी सुंदर विरंगुळा काय असू शकतो?

Followers