
अजय कांडरांच्या या ओळी किती वेगळी गोष्ट सांगू पाहतायत .‘झाडाबरोबरच वाढत गेलेल्या मुलीला आई सांगते ,झडत गेलेल्या झाडाविषयीची गोष्ट ’.इथे पुन्हा एकदा मुलीची काळ्जी करणारी आई आपल्याला भेटतेय .
तारुण्याच्या उत्साहात कदाचित मुलीला आवडणारही नसतं असलं बोलणं ,पण आईला मुलीला सावध केल्याशिवाय राहवतच नाही .तिनं बघितलीय जगाची रीत .झाडाची गोष्ट आपल्या मुलीबाबत घडू नये हिच तिची प्रार्थना आहे .