Monday, March 29, 2010

Being a father ..and that of the nation !



Bapu ,

your life is an inspiration
for ages to come .
It is an example ,
how pleasing the pain could be for some!

You lived `unto this last '.
You made `the nasty people 'think twice ,
with your challenging `fast' !

You tasted the truth first ,
And then made everyone to try his best !

You are the same , out and beneath .
You are the myth !!
Let me have your mind ,
and your strength !!!

Sunday, March 28, 2010

तान




पतंग-पक्षी
उरात उडतो
आनंदाची कमान
अवकाशाच्या वक्षी
उमटे
निर्मळ सुंदर तान !

Saturday, March 27, 2010

खेळ


ऊन खेळे सावलीशी
चित्त चित्ररूप घेई
कुंचला की कवडसा ?
रंगूनी रंगात जाई ?

शानुलं ,छकुलं ..



डोळ्यात तुझ्या दिसती
रंग किती न्यारे ..
भाव भावनांचे
हे क्षण किती प्यारे !

Thursday, March 25, 2010

सकाळचं ऊन




सकाळचं ऊन
उतरतं खोल खोल
करीत बसतं
इतिहास संशोधन,
धुंडाळतं
मेंदूच्या पेशी पेशी ,
जाणून घेतं,
रहस्य
डोळ्यातल्या
दाट काळोखाचं !
जिथं सूर्याचं तळपणंही
नाही देत
चाहुल प्रकाशाची !

Wednesday, March 24, 2010

‘आ आईचा’



मी सहावी-सातवीत असताना
माझ्या आईनं
पहिल्यांदा लिहिला
आ आईचा !
पण मग
न थांबता
लिहीत राहिली ,
वाचत राहिली ..
रानात गुरं राखताना ,
अंगणात ,ओट्यावर ,
घरात..
आई लिहिते पत्रं ,
रंगवते चित्रं ,
देते आकार मातीला ..

कोवळे चित्र




कोवळे ,कोवळे ,पोपटी, जांभळे
तुझे चित्र ओल्या पानात ओघळे

Followers