
लहान असल्यापासूनच ‘बैलं ’ बघायला मला का ते माहीत नाही पण खूप आवडतं !माझ्या खेळण्यांमध्ये असलेला लाकडाचा बैल अजून माझ्या आठवणीत आहे . त्याच्या गळ्यात दोरी बांधून गावभर हिंडवलं असणार त्याला मी ! आम्ही बेंदूर असल्यावर आमचे हे खेळणीतले बैलसुद्धा सजवत असू .त्यांची पूजा करीत असू .मारकुट्या बैलांची भीती असायची नेहमी .गावातल्या सगळ्याच बैलांचे स्वभाव आम्हाला चांगलेच ठाऊक होते .आता मुलं क्रिकेटच्या खेळांडूविषयी बोलतात तसे आम्ही बैलांविषयी बोलत असू .
चिखलाचे किंवा दगडाचे बैल तयार करणं ही एक मोठीच गंमत होती .मी चित्रं काढायला घेतली की बैल मनाच्या दारावर उभा राहतो म्हणजे राहतोच !
No comments:
Post a Comment