Wednesday, March 24, 2010

ती




ते बघणे आणिक उभे राहणे थेट
मज आठवते ती
आणि
तिची ती
भेट

अक्षरमाया




लिहिलेलं प्रत्येक अक्षर हा निरोप असतो
भविष्यात कुणासाठीतरी ..

वाचणार असतं अक्षरं
कुणासाठी , कुणीतरी
कधीतरी ...
मायेनं !

भटका कुत्रा




लक्ष त्याचं सारीकडे ,कुठे का तो बघेना
आभाळाच्या सावलीत , कुठे का तो पडेना

Tuesday, March 23, 2010

कोकरू ..


‘वेडं कोकरू ’कवितेत थकलेल्या ,वाट चुकलेल्या ,भ्यायलेल्या कोकराचं चित्र आपण वाचलंय .शेळीची ही निरागस बाळं मला मात्र वेड लावतात नेहमी !त्यांच्या लीला बघत बसावं नुसतं ! डोंगर उतारावर धावणारी कोकरं बघून मन किती प्रसन्न होतं ना ?आनंदाच्या प्रसंगी आपण सुद्धा मनात अशाच उड्या मारतो ना ?

‘बैलं माझी गुणवान ...’

मी अगदी
लहान असल्यापासूनच ‘बैलं ’ बघायला मला का ते माहीत नाही पण खूप आवडतं !माझ्या खेळण्यांमध्ये असलेला लाकडाचा बैल अजून माझ्या आठवणीत आहे . त्याच्या गळ्यात दोरी बांधून गावभर हिंडवलं असणार त्याला मी ! आम्ही बेंदूर असल्यावर आमचे हे खेळणीतले बैलसुद्धा सजवत असू .त्यांची पूजा करीत असू .मारकुट्या बैलांची भीती असायची नेहमी .गावातल्या सगळ्याच बैलांचे स्वभाव आम्हाला चांगलेच ठाऊक होते .आता मुलं क्रिकेटच्या खेळांडूविषयी बोलतात तसे आम्ही बैलांविषयी बोलत असू .
चिखलाचे किंवा दगडाचे बैल तयार करणं ही एक मोठीच गंमत होती .मी चित्रं काढायला घेतली की बैल मनाच्या दारावर उभा राहतो म्हणजे राहतोच !

Friday, March 12, 2010

waiting for a bus ..


I sketched this at a bus stop .It is a quick scribble .It required 20 seconds or so .Waiting is never a problem for me as I always have pen and paper with me .Life becomes an interesting waiting period .What is the next thing I am going to draw ?

Thursday, March 11, 2010

आम्ही पाखरं ...



सावित्रीच्या लेकींना नाही रहायचंय पिंजर्‍यात
पंख शिवशिवतायत कधीचे ..
घेण्या झेप
आभाळभर ...

Followers