Wednesday, February 24, 2010

स्मृतीचिन्ह



मला पुष्कळ स्मृतीचिन्ह मिळाली खरं ,
पण याची गोष्टच खूप वेगळी आहे .चित्रातल्या सुदर्शनची आजी त्या दिवशी हे स्मृतीचिन्ह माझ्या हातात देत म्हणाली होती ,"माझा मुलगा तयार करतो असलं ,आमच्या घरी पडून होतं .तुमच्या इथं ते चांगलं दिसेल .राहू द्या इथंच . " तिच्या भावनेचा अनादर करणं खूप अवघड होतं .त्या गमतीच्या टोपीतल्या नातवाची आणि त्या आजीची आठवण करून देणारं हे स्मृतीचिन्ह खूप वेगळं आहे ! एका रुग्णाने आपल्या डॉक्टरांचा केलेला सत्कार वाटतो मला तो !!

आठवण आजीची ..



जग जुनं डोळ्यात जिच्या..
जागं असतं जसंच्या तसं ..
तरी जपते नाती नवी ..
जमतं तिला कसं कसं .. !

Tuesday, February 16, 2010

रात्रीच्या कुशीत ...


प्रत्येकाचं मन वेगळं ,
ज्याचा त्याचा विचार वेगळा ,
दिवस वेगळा , रात्र वेगळी ...
रात्रीच्या कुशीत ,जवळ जरी
ती वेगळी ,तो वेगळा ...

Followers