Friday, March 2, 2012

खेळता खेळता


त्या दिवशी
मालवणच्या ‘नाथ पै सेवांगणात’
मी पुन्हा एकदा
बचत गट कार्यकर्त्यांशी गप्पा करत होतो.
मला वाटतं, २३ फेब्रुवारीची सकाळ होती ती.
आम्ही वर्तुळाकार बसून बोलत होतो.

"मी एक वाक्य बोलेन.
मग ओळीनं प्रत्येकानं
आपलं एकेक वाक्य त्याला जोडत जायचं.
अशी एक गोष्ट तयार होईल असं बघायचं."
असं मी म्हटलेलं.

सुरुवातीला साशंक असणारे
सगळे हळुहळू गोष्टीत छान रुळू लागले.
प्रत्येकाच्या विचारानुसार आणि भावनिक स्थितीवर
गोष्टीत बदल होत होते.
सगळ्यानाच मोठी गम्मत येत होती.
हसण्याचे आवाज सगळीकडे व्यापून राहिले
आणि रंगत वाढतच गेली.
चार-पाच गोष्टी तयार झाल्या.

 सगळ्यानाच आश्चर्य वाटत होतं या नव्या खेळाचं!
गोष्टीतून आम्ही आजच्या स्त्रीचे प्रश्‍न समजून घेत होतो.
मी एकट्यानं काही बोलत रहाण्याऐवजी सगळेच बोलत होते .
सगळ्यानाच आपली मतं मांडता येत होती..खेळता खेळता!

1 comment:

Followers