Friday, April 16, 2010

चित्र पहावे काढून ..चित्र काढण्यात केवढा आनंद आहे !
पण चित्राला सुरुवात करणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे .
एकतर चित्र खुणावत असताना आपण नेमके दुसर्‍या कामात असतो .

तैल रंगात काम करणं हे आणखी कष्टाचं .
मी कधीतरीच त्या वाटेला गेलोय .
माझ्या मुलीचं,रुपालीचं हे चित्र
असंच खूप दिवसांनी केलेलं चित्र आहे .
अर्थात चित्रातल्या रंगांप्रमाणे
हिरवाई निर्माण झाली
या चित्रामुळे
वातावरणात!

No comments:

Post a Comment

Followers