Tuesday, April 6, 2010

एकांतीकधी एकांती नाचे मी
तर कधी वाचे मग मलाच मी
मिटुनी डोळे आनंदाने
मलाच घेई कवेत मी !

कविता कधी होऊन बसे मी
चित्रच वा होऊन हसे मी !
स्वप्न उद्याचे अंतरात तरी
काळाच्या पोटात घुसे मी !

1 comment:

Followers