Thursday, March 25, 2010

सकाळचं ऊन
सकाळचं ऊन
उतरतं खोल खोल
करीत बसतं
इतिहास संशोधन,
धुंडाळतं
मेंदूच्या पेशी पेशी ,
जाणून घेतं,
रहस्य
डोळ्यातल्या
दाट काळोखाचं !
जिथं सूर्याचं तळपणंही
नाही देत
चाहुल प्रकाशाची !

No comments:

Post a Comment

Followers