Tuesday, June 22, 2010

सहज जाता जाता ..शांतपणे चित्र काढत बसताच येत नाही .

वेळ मिळताच एखादं रेखाचित्र काढतोय .

रंगांमध्ये डुंबायचं राहून गेलंय कधीचं .

......................

रेषेबरोबरचा प्रवास सुंदरच आहे .
रेषा बघता बघता नवं गाव वसवते .

रेषा खेळत असते आट्या पाट्या ..
प्रत्येक वेळी लोण पोहचतंच असं नाही .

एक रेषा चुकली तरी
बाद होतो मी .

पुन्हा राज्य घेतो मी !

No comments:

Post a Comment

Followers